भारत हा जगातील एकमेव देश आहे जो आपल्या संविधानामध्ये जनावरांची काळजी आणि जनावरांबाबत दया याचा विचार केला जातो.त्याच्या कायद्यानुसार, ज्या जनावरांचे वय वर्षे १६ पेक्षा जास्त आहे आणि जी जनावरे काही कारणाने निरुपयोगी झाली आहेत अशांनाच मारले जाऊ शकते. मग ४ ते १२ महिने वर्षाच्या म्हशी आणि गायीचे मास निर्यात करायची परवानगी कशी मिळते.
१९४७ पासून कत्तलखान्यांची संख्या ३५० वरून ३६००० पर्यंत कशी पोचली ?
एक गाय किंवा म्हशीच्या माणसाची किंमत रुपये २०,०००/- जर होत असेल तर हाच प्राणी त्याच्या १८ वर्षाच्या आयुष्यात एकूण ३,००,००० किमतीचे किंबहुना त्यापेक्षा जास्त किमतीचे दूध, क्रीम, बटर, मूत्र आणि शेण या स्वरूपात उत्पादन देते. म्हणजे कमीत कमी २,८०,०००/- एवढा तोटा आपला देश कारण नसताना भोगतो आहे.
आपला देश मासाची आणि चामड्याची विक्री यातून परकीय चलनाचा फायदा पहात असल्यास आपला देश तर मोठ्या प्रमाणात युरिया सारखी रासायनिक खते, सेंद्रिय खते, दुधाची पावडर, बाहेरील देशातून खरेदी करत असतो. जर प्राण्यांना न मारता उत्तम संगोपन केले गेले तर देशा बाहेर जाणारे पैसे तर वाचतील.
सरकार काही विशिष्ट व्यवसाय / उद्योगांना आर्थिक सहाय्य देत आहे. नवीन कत्तलखाने उघडण्यासाठी सरकारने १००% आधारभूत घोषणा केली आहे आणि कृषी विभागाने आधीच अनेक कत्तलखाने मंजूर केले गेले आहेत. भारतीय मांस फक्त ४०% आंतरराष्ट्रीय भाव आणते. मग या उद्योगाचे समर्थन करण्याचा काय अर्थ आहे ?
सरकारच्या म्हणण्या प्रमाणे प्राण्यांना जर मारले नाही तर त्यांची संख्या वाढत जाईल आणि मोठा प्रश्न निर्माण होईल. तथापि, त्याच आकडेवारीनुसार, दरडोई प्राण्यांची संख्या वेगाने कमी होत आहे असे दिसून आले.
जागतिक कल हा शाकाहाराकडे झुकतो आहे. विकसित देश मांस खाण्याच्या धोक्यांबद्दल शिकत आहेत. १९८० पासून ब्रिटनने कोणताही नवीन कत्तलखाना उघडलेला नाही, तर भारत सरकारने मात्र खूप मोठ्या प्रमाणात नवीन कत्तलखाने उघडण्याही परवानगी दिली आणि जुन्या कत्तल खान्यांचे आधुनिकीकरण केले जात आहे.
प्राण्यांच्या बाबतीत केली जाणारी क्रूरता टाळण्यासाठी कायद्यानुसार, कोणत्याही प्राण्याबरोबर क्रूरतेची वागणूक (मारणे,ओझे लादणे, वेदना / हाल करणे, इत्यादी) म्हणजे अपराध मानला जातो. त्याच वेळी अश्या प्रकारावर म्हणजे प्राण्यांची कत्तल करण्यास परवानगी आहे ! याचा अर्थ काय होतो ?
हे कार्यक्षम आधुनिक कत्तलखाने प्रति दिन १०,००० प्राण्यांना मारु शकते.
या प्राण्यांना सहज आणि वेदना रहित मारले जात नाही. मृत्यू व्हायच्या आधीपर्यंत त्यांना अनेक यातनांमधून जायला लागते.
त्यांना ट्रक मधून कत्तलखान्या पर्यंत दूर दूरच्या अंतरावरून आणले जाते. वाहतुकीचे पैसे वाचावे म्हणून एका तर्क मध्ये २० ते २५ मोठे वयस्क रेडे, म्हशी, बैल, गायी, एकत्रित आणतात. या प्रवासाला एक दिवस अथवा दोन दिवस कितीही वेळ लागो या प्राण्यांना चार पाणी आदी काही दिले जात नाही. त्यांना अश्या दाटीवाटीने करकचून बांधले गेलेले असते की त्यांच्या एकमेकांच्या वजनाने आणि शरीराने पाय, शिंगे मोडणे ,मोठ्या मोठ्या जखमा होणे हे तर ठरलेलेच आहे. जो पर्यंत गाडी कत्तलखान्यात पोचते तो पर्यंत सर्व प्राण्यांची अवस्था अशी होते की त्यांना त्यांच्या स्वताच्या पायावर उभे राहातच येत नाही. तसेच त्यांना फरफटवून गाडीतून खाली ओढून काढले जाते. त्यात पुन्हा बरेच प्राणी जखमी होतात. ज्या ठिकाणी असे हजारो प्राणी आणून उतरविले असतात अश्या ठिकाणी त्यांना शेवटचा मोकळ्या हवेतील श्वास घेण्याची संधी मिळते. त्यांना पुढे कमीत कमी ४ दिवस विना चार पाणी, भुकेलेले ठेवले जाते, त्यांचे पाय मुद्दाम तोडले जातात किंवा डोळे फोडले जातात म्हणजे ते निरुपयोगी असल्याचे प्रमाणपत्र कत्तलखान्याला मिळवून मारायचे असते. नंतर या जनावरांची कातडी मऊ होऊन सहज रित्या शरीरापासून वेगळी व्हावी म्हणून २०० डिग्री तापमान असलेले गरम उकळते पाणी त्याच्या शरीरावर एका खोलीत नेऊन पाच मिनिटे मारले जाते. यात चक्कर येऊन हे प्राणी खाली पडतात मग त्यांना एखादा पाय किंवा शेपटी धरून किंवा टोकेरी जाडजूड लोखंडी हुकात अडकवून क्रेनने वर उचलले जाते आणि त्यांचा गाला धारदार शस्त्राने अर्धवट कापला जातो जेणे करून त्यांचे सर्व रक्त शरीरातून बाहेर वाहून जावे.
कत्तलखान्यांचा जंगलांवर होणारा परिणाम
स्वातंत्र्यकाळा नंतर कत्तलखान्यांमुळे शेण्यांचे वापराचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात एकदम कमी झाले. लोकांना त्यामुळे जळणासाठी सरपण म्हणून लाकूड वापरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. एकंदरीत १९७५ ते १९८५ या काळात जळाऊ लाकडाच्या दरापासून ते अन्नधन्या पर्यंतचे सर्व दर एकदम दुप्पट झाले. म्हणूनच भरपूर पैसे मिळविण्याचा, एक साधा व उत्तम मार्ग म्हणून लाकूड मोठ्या प्रमाणात तोडले जाऊ लागले अर्थात झाडे तोड मोठ्या प्रमाणात होऊ लागली.
एका अभ्यासानंतर फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन कडून मिळालेले आकडे जागतिक बँकेने सर्वांसमोर मांडले त्या प्रमाणे १९८८ मध्ये २६,४०,००० क्युबिक मीटर एवढे लाकूड भारतात तोडले गेले की ज्यातील २४,००,००० क्युबिक मीटर एवढे लाकूड केवळ सरपणासाठी जाळायला म्हणून तोडले गेले. त्यातील ९०% लाकूड केवळ सरपण म्हणून वापरले गेले तर उर्वरित १०% लाकूड कागदासाठी लगदा बनविणे,बांधकाम आदी इतर उपयोगासाठी वापरले गेले.
एक ५ वर्षाचे झाड साधारण १०० ते १२५ किलो गॅस तयार करते असे धरले तर साधारण ५ जणांच्या एका कुटुंबाला ११२५ किलो सरपण वर्षाला लागते म्हणजे साधारण ५ वर्षांची १० झाडे एकवर्षात एका कुटुंबासाठी तोडायला लागतील.(Ref. Report of the Firewood Study Committee appointed by Planning Commission, June 1982- pp. 27)
परंतु एक मोठे जनावर (म्हैस किंवा गाय) १ वर्षात साधारण ५ टन (५००० किलो) शेण देते की जे ७१२.८ किलो लाकडाच्या बरोबरीने इतके स्वयंपाकाला उपयोगी येईल. (Report of Firewood study Committee, June 1982 Page 13 and Letter from Punjabrao Krishi Vidyapeeth, Akola, dated 16-4-93)
अर्थातच १ एक गाय दर घरात सांभाळली गेल्यास दरवर्षी ६ झाडे कापली जाण्यापासून वाचू शकतील. म्हणजेच दर एका घरामध्ये कमीतकमी एक गाय सांभाळली गेल्यास जंगले वाचतील.
एका गायीचे शेण एका कुटुंबाला वर्षभर सरपण पुरवू शकते आणि एका गायीच्या शेणामुळे ६ झाडे वाचतील
गायीच्या शेणापासून २४ तासात शेण्या बनवून तयार होतात. म्हणूनच आर्थिक,सामाजिक आणि निसर्गाचे खूप मोठे फायदे या शेण्या वापरल्याने होऊ शकतात. त्यामुळे याला आदर्श ऊर्जेचा स्रोत म्हणणे योग्य ठरेल.अक्षय आणि सुरक्षित ऊर्जेचा स्रोत म्हणून या शेण्या नक्कीच मान्यता प्राप्त करतात. याच प्रमाणे कत्तलखाने बंद झाल्यास याच गायी, म्हशी कोट्यवधी झाडे तोडली जाण्यापासून वाचू शकतात.
भारताची गरीबी, वाढती जंगलतोड आणि जमिनी धूप होणे व ती निकृष्ट दर्जाची होणे याचा जवळचा संबंध आहे.
३२९ दशलक्ष हेक्टर्सपैकी अर्धा भाग कुठल्या ना कुठल्यातरी कारणाने कमी दर्जाचा मानला गेला आहे. १९७० व १९८० च्या दशकातील उपग्रहांच्या प्रतिमेमुळे असे दिसून आले की दर वर्षी १.३ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील जंगलातील झाडे तोडली जात आहेत. वन प्रबंधना अंतर्गत असलेल्या ७५ दशलक्ष हेक्टर जंगलामधील ४० दशलक्ष हेक्टर एवढा भाग झाडांनी झाकला गेलेला नाही. ३३% भाग हा जंगलयुक्त असणे ही खरी आदर्श स्थिती मनाली जाते परंतु यांच्या तुलनेत विद्यमान परिस्थितीत फक्त १२% भाग जंगलयुक्त आहे.
शेणाची उपलब्धतेची घट म्हणजे जंगल, वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरणाचा नाश
अर्थातच शेणाच्या घटत्या प्रमाणामुळेच जंगलांची श्रीमंती नाहीशी झाली आहे आजच्या किमती प्रमाणे जंगलातील हजारो वर्षांची लाखो,करोडो झाडे नष्ट केली गेली आहेत ज्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे करोडो आभाजावधी रुपयांची किंमत होते. म्हणजेच अशी झाडे वाचविणारे शेण किती मूल्यवान आहे आणि त्याचबरोबर असे मूल्यवान शेण देणाऱ्या गायी, म्हशी किती किमती मानली पाहिजेत !
म्हणूनच कत्तलखाने चालविण्याची परवानगी देण्यातून काही जणांचे हित संबंध जरूर जपले जातील परंतु. देशाचे केवढे मोठे नुकसान सर्वाना, सर्वच देश वासियांना भोगायला लागत आहे याची किंमतच करता येत नाही.
जांगलतोडीमुळे मोठयाप्रमाणात पाणीसाठ्यांवर परिणाम होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे जंगलातील कित्येक प्रकारच्या शाकाहारी प्राण्यांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यांना अन्न पाण्याविना प्राणाला मुकावे लागते अर्थातच या प्राण्यांच्या कमतरतेमुळे मांसाहारी प्राण्यांवर परिणाम झाला त्यांची देखील मोठ्या प्रमाणात संख्या कमी झाली, पक्ष्यांचे जीवन देखील धोक्यात आले आणि सर्वच वन्य जीवनच संपुष्टात येत चालले आहे.
ही जनावरे जंगलात चरायला सोडल्यामुळे त्यांचेमलमूत्र विसर्जन तेथे होत असे आणि विविध आवश्यक पोषक तत्वे तिथल्या मातीत निर्माण होऊन झाडांना प्राप्त होत होती. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधींसाठी लागणाऱ्या जंगली वनस्पती मोठया प्रमाणावर उत्तम गुणधर्मासहित प्राप्त होत होत्या त्याच्यावर देखील मोठा दुष्परिणाम झालेला आहे.
पर्यावरण सुधारण्यास आणि संतुलित ठेवण्यास भारतीय गोवंश उत्तम सहाय्यक आहे. गाय प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन घेऊन उच्छवासावाटे पुन्हा काही प्रमाणात ऑक्सिजन सोडते. भारतीय गायीच्या गोमय राखेचा, गोमुत्राचा उपयोग जमीन, पाणी, वास्तु, वातावरण शुद्धी करिता होतो. म्हणूनच असे नक्की सांगता येईल की झाडे तोडून ती जळणासाठी वापरण्या पेक्षा गायीच्या गोमयाच्या शेण्या करून जर वापरल्या तर नक्कीच निसर्गाचा ऱ्हास मोठया प्रमाणावर थांबेल. गाय हा असा एकच प्राणी आहे की उच्छवासातून साधारण १६ टक्के पर्यंत ऑक्सिजन सोडते.
आज मितीला भारता प्रमाणे जवळ पास १८० देशात रासायनिक खते, किट नाशके, तण नाशके वापरली जात आहेत. एकट्या भारतातच काही लक्ष टन खते जमिनीत टाकली जातात याने जमीन,पाणी, जमीनी खालील पाण्याचे साठे, हवा सर्च प्रदूषित होत आहे, कित्येक निसर्गास आवश्यक जीव नष्ट होत चालले आहेत. जर भारतीय गायीच्या गोमय गोमुत्राचा आणि तिच्या गव्याचा वापर शेतीत केला गेला तर किती मोठ्या प्रमाणावर सर्वच प्रकारचे प्रदूषण वाचेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.