सौ. कविता अ. चांदोरकर (शिक्षण – बी.कॉम. आणि योग शास्त्र डिप्लोमा-बिहार योग भारती) यांच्या अथक प्रयत्नांमुळे माधव मिलिंद फाउंडेशन आकारास आले आहे. लग्नानंतर त्यानी काही काळ ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ह्यांच्याबरोबर काम केलं आणि त्या काळात परमहंस निरंजनानंद सरस्वती ह्यांच्या कडून मंत्र दीक्षा झाली. नंतर मुंगेर, बिहार मध्ये राहून योग कोर्स पूर्ण केला. अनेक मोठ्या लोकांना योग प्रशिक्षण दिले. योग क्षेत्रात “सन्यासी नम्रता” ह्या नावाने ओळखले जात होते.
अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सी.ई.ओ. तसेच उर्र्शिला केरकर, टिना अंबानी, डिंपल कपाडिया, डायमंड क्षेत्रातले अनेक जण तसेच भायखळा जेल मध्ये महिलांना योग शिकवून त्यांनी योगविद्येचा प्रचार प्रसार केला. योग शिकवण्याचा अनुभव घेतला. योग शिकवताना आलेल्या अनुभवा प्रमाणे त्यांना दिसून आले की मारवाडी, जैन, ब्राह्मण अशा शाकाहारी लोकांना जास्त रोग विषयुक्त अन्न खाल्याने होत आहेत. म्हणून आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्मिक साधना करायच्या उद्देशाने आणि परमगुरू सत्यानंद ह्यांच्या भविष्यवाणी प्रमाणे त्यांनी केळशी रत्नागिरी जिल्हा येथे जमीन खरेदी केली.
२०१५ दरम्यान त्यांना गायी बाबत माहिती मिळाली. गोसेवा व्हावी असे मनात आले. त्या काळात जैविक, सेंद्रिय शेती, गो आधारित शेती अशी संकल्पना विशेष कुठेही दिसत नव्हती. त्यांना देखील शेती बद्दल काही विशेष माहिती नव्हती. प्रत्येक गोष्ट ही तपासून विविध प्रकारे अभ्यासून आणि स्वताच्या मन संवेदानाचे सहाय्याने करू लागल्या. योग मार्ग असो किंवा सामान्य जीवनासाठीचा आवश्यक आहार असो या साठी मूळ हे गाईंचे शेण, पंचगव्या आवश्यक आहे असेच उत्तर त्यांना प्रत्येकवेळी मिळत होते. आणि आयुष्यात पहिल्या ३ गाई आल्या.
त्यानंतर गायीचे संगोपन, पालन पोषण असे करायचे, गायीचे दूध कसे काढायचे या अगदी प्रार्थमिक गोष्टी पासून आवश्यक सर्वच गोष्टींची माहिती गायीच देत आहेत असे त्यांना भासू लागले.त्या गायींचे बरोबर कशा आणि कधी एकरूप झाले त्यांचे त्यांनाच कळले नाही. अनेकांना नाराज करून योग शिक्षक क्षेत्राला पाठ फिरवली आणि भक्ती योग, गो भक्ती योग आपोआप स्वीकारला गेला.
त्यांना एक नवीन क्षेत्र पूर्ण कष्टाने परंतु पूर्ण समाधानाने भरलेले गवसले. परिवाराने सुरुवातीस साथ दिली आणि गोठ्यात गिर गोवंश आला. कृषी आणि पशुपालन ह्यातल्या योग दानासाठी अनेक पुरस्कार मिळाले मिळाले, ऍग्रोवन पेपर, तनिष्का मासिकात भरभरून लिहून आलं. सगळं सुरळीत चाललं होतं आणि कोरोना नंतर लगेचच निसर्ग वादळ आल आणि निसर्ग वादळाने तर घर, गोठा, लावलेली अनेक झाडे, कुत्री अक्षरशः उडवून नेली. मोठं नुकसान झालं. वादळात गोठ्याचे पत्र्याचे मोठेच्या मोठे छप्पर उडवून हवेत फिरत फिरत आणि गायी यांच्या मध्ये पडले. त्या आणि गायी सगळ्यातून वाचले. घरात त्या गायी आणि कुत्री यांचे व्यतिरीक्त कुणीच नव्हते. दैवाने मोठा प्रसंग टळला. घरचे लोक चार दिवसांनी इथे पोचले, अस्ताव्यस्त परिस्थिती पाहून गायी सोडून देऊन पुण्यात त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानी गायी न सोडण्याचा संकल्प केल्याने ते सर्व हतबल होऊन निघून गेले ते आज पर्यंत आणि गायी हेच त्यांचे जीवन होऊन गेले.
आज पर्यंत केवळ गायींच्या साथीनेच काम चालू आहे. ना कुणाची साथ ना कुणाची मदत. घरच्यांनी गायी सोडून द्याव्यात म्हणून त्यांची आर्थिक कुचंबणा केली, सर्व दागीने आदी गोष्टी गायब केल्या गेल्या शेवटी घरच्यांनी देखील त्यांची साथ सोडली.
हळू हळू गो आधारित शेती सुरु केली. कातळात नारळ -पोफळी, मसाला पिकांची लागवड केली. काजू, आंबा, लागवड केली आहे तसेच आंतरपीक म्हणून हळद आणि गाईसाठी चारा लावला. लोकांनी गो आधारीत शेती सुरु करावी म्हणून प्रचार प्रसाराचा प्रयोग स्वतः तसे करून चालू आहे. जीवामृत, गोकृपा अमृतं तसेच माझ्या गोठ्यातील खतावर सर्व झाडांची जोपासना केली जाते. उत्तम नंदी व्हावेत त्यासाठी स्वतः कडे प्रयत्न आहे.
भविष्यात आपल्या गोशाळेत गोकाष्ट तयार करून केळशी आणि इतर गावातील स्माशांनाना पुरवठा करून गोशाळेला आर्थिक सक्षम करायचा त्यांना प्रयत्न करायचा आहे.
संस्थेकडे सध्या ३४ गोवंश आहे. एकदा भेट द्या आणि इथल्या गो वंशाची प्रत पहावी ही नम्र विनंती.
संस्थेची ध्येये / उद्दिष्ट्ये
१) गो पालन, गोसंवर्धन, गो रक्षण, व्यवस्थापन
२) गो आधारीत सेंद्रिय शेती
३) पर्यावरण,
४) घनकचरा व्यस्थापन
५) संस्कृती, संस्कार, देशप्रेम बाबत जनजागृती
६) ग्राम विकास, महिलाआणि बाल विकास
७) मनुष्य व प्राणी शारीरिक आणि मानसिक आरोग्य
८) समान उद्दिष्ट्ये असणाऱ्या इतर संस्थांना मदत,
९ ) स्वयंसेवी संस्था, शाळा विकसन व सहाय्य
संस्था नोंदणीचा तपशील
Registered Under Public Trust Act 1950 F 0007495 Dt: 12/08/2025
Societies Registration Act 1860 Ratnagiri/0000109/2025 Dt: 16/05/2025
पत्ता:
रोवळे, केळशी, तालुका- दापोली,
जिल्हा- रत्नागिरी, महाराष्ट्र पिन- 415717
Email: milind.madhav.foundation@gmail.com
बँक अकाउंट तपशील
Name : Milind Madhav Foundation Goshala
Account Number: 146110210000071
IFSC: BKID0001461
Address: Kelshi, Dapoli

श्री हेमंत दांडेगावकर
अध्यक्ष

श्री संजय जोशी
उपाध्यक्ष

श्री कल्याण कुलकर्णी
कार्यवाह

सौ. कविता चांदोरकर
चिटणीस

श्री आनंद जोशी
खजिनदार

श्री मिलिंद देवल
विश्वस्त

श्री मोहित गोगटे
विश्वस्त
