गाय आणि दुग्धव्यवसाय

न्युझीलंडमधे विविध शहरांमध्ये रहाणाऱ्या लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते. त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती १९९३ मधे नेमली होती. या समितीने मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे जैवरासायनिक विश्लेषण (biochemical analysis) केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे या सर्व रोगाचे कारण म्हणजे दुधातील प्रथिनातील बीटाकेसीन आहे. बीटाकेसीनचे १३ प्रकार १९७२ सालापासून माहित आहेत त्यातील ए१ आणि ए२ हे दोनच प्रमुख आहेत. दूध प्रथिनांच्या बीटाकेसीन साखळीत २०९ अमायनो ॲसिड्स आहेत. ए१ बीटाकेसीन साखळीत ६७ व्या क्रमांकावर हिस्टीडीन हे अमायनो ॲसिड आहे. तर ए२ बीटाकेसीन साखळीत ६७ व्या क्रमांकावर प्रोलीन नावाचे अमायनो ॲसिड असते. या वरवर किरकोळ वाटणाऱ्या ६७ क्रमांकावरील फरकाचे गंभीर दुष्परिणाम मानवी आतड्यात पचन होताना भोगावे लागतात. ए१ दुधातील हिस्टीडीनमुळे बिटाकेसीनपासून बीटाकेझोमॉरफिन ७ (बीसीएम७) हा पेप्टाइड बनतो तर ए२ दुधातील प्रोलीन पासून बीटाकेझोमॉरफिन ५ किंवा १ पेप्टाइड बनतो. पेप्टाइड म्हणजे प्रथिनाचा तुकडा, बीसीएम ७ हा पेप्टाइड रक्तात शोषला गेल्यावर विष बनतो.

डॉक्टर बॉब इलीयॉटच्या निष्कर्षाने जर्सी, होल्स्टेन फ्रीजीयन, रेड डॅनिश या युरोपियन काउचे दुध हे न्युझीलंडमधील विविध शहरांमध्ये रहाणाऱ्या लहान वयातील मुलांमध्ये होणाऱ्या मधुमेहाचे कारण होय. एकदा हे बीसीएम ७ रक्ता मार्फत शरीरात पसरले की पचन संस्थेतील आणि मेंदूतील काही आस्मिक (recepters) केंद्रांना ते सक्रीय करतात. मग आतड्याची हालचाल मंदावते, श्वसन वेग मंदावतो, वागणुकीत बदल होतो, बद्धकोष्ठता, वाताचे रोग होतात.

या संशोधनानंतर या विषयावर परत ९७ वेळा विविध तज्ज्ञ्यांनी अभ्यास केला. सर्वांचा निष्कर्ष सारखाच आहे. बी.सी.एम.७ हे एक अफू सारखे गुंगी आणणारे औषध आहे. ए१ बीटाकेसीन हृदरोग, मधुमेह, स्वमग्नत ( ऑटीझम), स्वविरोध (ऑटोइम्यून), रोग प्रतिकारक शक्ती संपणे, दुध पचविण्याची शक्ती संपणे या सारख्या रोगांचे कारण बनते. बी.सी.एम.७ हे विष युरोपियन प्राण्यांच्या दुधातील ए१ बीटाकेसीन पासून बनते या सिद्धांताचा उद्घोष १९९३ साली झाला. २००७ मध्ये न्यूझीलंडच्या डॉ. किथ वूडफोर्ड यांनी १५ वर्षातील जागतिक संशोधनाचा तपशील “डेव्हिल इन द मिल्क” या पुस्तका मार्फत जगासमोर आणला. या संशोधनाप्रमाणे एच.एफ., जर्सी या गायी ए१ प्रकारात मोडतात आणि भारतीय गोवंश ए२ या प्रकारात मोडतो.

भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे जेव्हा या शास्रज्ञांनी भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायीचे दुध हे A2 प्रकारचे असुन ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. इतकेच नाही तर मधुमेह ह्रदयरोग कॅन्सर इ. विविध आजार दूर करण्याची त्यामधे क्षमता आहे. भारतीय देशी गायीच्या तुपामुळे ह्रदयरोग्याच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल दूर होते तर गोमुत्रामुळे कॅन्सर बरा होतो. विचार करा आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते. जे आधुनिक शास्त्रज्ञांना समजायला इतकी वर्षे लागली की देशी गायीचे दुध तूप गोमूत्र मानवी आरोग्यासाठी वरदान आहे हे हजारो वर्षापुर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगितलंय. ज्याप्रमाणे महाभारतामधे कृष्णाला विषारी दुध पाजून मारायला पुतना नावाची राक्षसीण आली होती अगदी त्याच पध्दतीने सध्या भारतीयांपुढे जर्सी होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांच्या दुधाचे ओढवुन घेतलेले संकट आहे असे कोणाला वाटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही.

दुधावरील या संशोधनामुळे न्युझीलंड, अमेरिका,ऑस्ट्रेलिया, ब्रिटन , ब्राझील या देशांमधे जर्सी , होल्स्टेन फ्रिजियन या प्राण्यांचे A1 दूध पिणे बंद केले असुन भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे.इतकेच काय पण तिथे विकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांवरही ते दुध A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याचे बंधन आहे.खरे तर भारतातही दुधाच्या पिशव्यांवर त्यातील दूध हे A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याची मागणी ग्राहकांनी करायला हवी कारण आपण काय विकत घेतो त्याबद्दल जाणुन घेण्याचा ग्राहकांना कायद्याने पूर्ण अधिकार असतो. जसे तंबाखू, सिगारेटच्या पॅकेटवर त्याचे सेवन आरोग्यास घातक असल्याची सूचना लिहिली जाते त्याप्रमाणे

भारतात मात्र या बाबतील पूर्ण गोंधळच आहे. अजुन आम्हाला दुधाच्या A1 व A2 मधील फरकच माहित नाही.सर्वसामान्य जनतेला गायीचे दूध (cow milk) या गोंडस नावाने जर्सी या घाणेरड्या प्राण्याचे रोगकारक A1 दुध विकले जाते.सध्या लोकाना आपली खरी गाय कोणती व विदेशी जर्सी प्राणी कोणता हा फरकच समजानासा झालाय.इतका की अगदी Whats app च्या smileys मधे देखील हे जर्सीचे चित्र दिले आहे, त्यास आपण गैरसमजाने गाय समजतोय. देशी गाय व जर्सी हे एकमेकांपासुन पूर्ण वेगळे आहेत.दोन्ही समोर ठेऊन निरीक्षण करा म्हणजे फरक समजेल. जर्सीचे दुध प्यायल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.अगदी लहान मुलांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे.आम्ही एकीकडून मधुमेहावर उपाय म्हणून महागडी औषधे घेतो तर दुसरीकडे गायीचे समजून जर्सीचे A1 दुध पितो.कसा रोग बरा होणार ??आहे की नाही गोंधळ ??

गेल्या ४० वर्षांपासुन विदेशातून जर्सी भारतात आणल्या तेंव्हापासून भारतात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.आपल्या शास्त्रज्ञानी श्वेतक्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचे विदेशी जर्सी प्राण्यांबरोबर संकर करुन भारतीय गायींचा वंश नासवला . त्यामुळे देशी गायींच्या ८० पैकी ५७ जाती नामशेष झाल्या व जर्सीचे रोगकारक दूध पिण्याची वेळ जनतेवर आली. एके काळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणाऱ्या आपल्या देशात आज देशी गायीचे दूध मिळणे अवघड बनले.देशी गायीचे तूप मिळणे तर फारच दुर्मिळ, कसेबसे राजस्थानातील पथमेडा या ठिकाणी शुध्द देशी गायींना जतन केले आहे . प्रयत्नपूर्वक तेथील शुध्द गायीचे तुप मिळू शकते ही त्यातल्या त्यात जमेची बाब.परदेशांनी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधून देशी गायी नेऊन त्यांची उत्तम शुध्द स्वरुपात जोपासना केली आहे. ब्राझीलमधे साठ लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत. तर मूळ भारतात त्यांची संख्या शिल्लक आहे फक्त तीन हजार. ब्राझीलमधे एका भारतीय गीर गायीचे दिवसाचे दूध उत्पादन आहे ६४ लिटर. (इंटरनेटवर ही सर्व माहिती आहे.) असे असुनही आपले डोळे अजूनही उघडलेले नाहीत.भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी गायींचा जर्सीबरोबर संकर करुन त्यांचा वंश आपण नासवून विषारी बनवत आहोत.हे असेच चालू राहिले तर येत्या पाच वर्षात देशी गायी भारतातून नामशेष होतील असा इशारा तज्ज्ञांनी भारताला दिला आहे.

ए१/ए२ या सिद्धांतामुळे भारतीय गोवंशाचे मोठेपण जगासमोर आले आहे, या मुळे जगभरात खळबळ माजली असली तरी भारतातील शेतकरी आणि सामान्य लोकांना याची जाणीव अजूनही नाही. विज्ञान दृष्टीकोनातून जगाला आज दुधाच्या एका घटकाच्या संशोधनानंतर भारतीय गोवंशाचे मोठेपण कळते आहे. दुर्दैव असे आहे की आजची मानव जात स्वार्थी आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन भोगवादी झाली आहे म्हणूनच त्यांना गायीच्या इतर फायद्याच्या वस्तूंचे ज्ञान अवगत नाही. परंतु पुरातन काला पासूनच भारतातील गायींना गोमाता म्हटले आहे. दुसऱ्या कुठल्याही चतुष्पाद प्राण्याला नाही. याची कारणे अनेक आहेत. ती जाणून घेणे जरुरीचे आहे. दुसरे दुर्दैव असे आहे गायीला प्राणी म्हणून बघितले जात आहे.

देशी गाईच्या दूधात सूक्ष्म तूपाचे कण ३.७० मायक्रॉन जाडीचे असल्यामुळे ते मेंदूच्या आवरणामधून प्रवेश करू शकतात. तसेच प्रथिने ही ‘बीटा केसीन ए २’ असल्यामुळे तसे ‘ओमेगा ३ व ६ तत्त्व’ यामुळे हे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आरोग्याला उपकारक असून त्यामुळे मानवीय आरोग्य उत्तम राहते.‘संकरीत गायी’च्या दुधामध्ये ४.८७ मायक्रॉन जाडीचे सूक्ष्म तुपाचे कण असून ते मेंदूच्या आवरणातून प्रवेश करू शकत नाहीत. तसेच ‘बीटा केसीन ए १’ प्रथिने असतात. तसेच ‘ओमेगा ३ व ६ तत्व’ नसल्यामुळे सांधेदुखी, डोकेदुखी, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि मस्तिष्क विकार होतात. देशी गार्इंच्या दुधामध्ये ‘सॉलीबर फॉस्फेट’ हे तत्त्व संतुलित प्रमाणात म्हणजे १ मिली लिटरमध्ये १८ मायक्रोग्रॅम असल्यामुळे ते पचायला सोपे जाते. कुठल्याही वयात आणि आजारी व्यक्तीला ही उपकारक आहे. देशी गाईच्या तुपामुळे ‘कोलेस्ट्रॉल’ वाढत नाही.