गाय आणि मानवी आरोग्य

पंचगव्य चिकित्सा एक उत्तम चिकित्सा पद्धती आहे. त्यावर अनेक प्रकारे संशोधन होणे जरुरीचे आहे. केवळ गोमुत्राच्या संबंधात गोविज्ञानने ५ पेटंट मिळविली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने अनेक रोगांवर आधुनिक वैद्यक शास्त्रात उपचार नसल्याचे म्हटले आहे. अशा रोगांवर पंचगव्य ही प्रभावी उपचार पद्धती सिद्ध झाली आहे.

परमपवित्र रसायन : पंचगव्य !

गोमाते पासून प्राप्त होणाऱ्या दूध, दही, तूप, शेण, मूत्र या पदार्थांना गव्य म्हणतात. गाईच्या वा बैलाच्या पित्ताशयात सुकलेल्या द्रव्य पदार्थाला गोरोचन म्हणतात. दूध, दही, तूप, शेण, मूत्र या पाच पदार्थांच्या विशिष्ट प्रमाणातील मिश्रणास पंचगव्य म्हणतात. तसेच पंच गव्यात वापरले जाणारे पाच आणि गोरोचन या सहा पदार्थांना मिळून गोषडंग असे म्हणतात.

ताजे गोमूत्र त्याच्या निम्मा गाईच्या ताज्या शेणाचा रस,गोमुत्राच्या चौपट गाईचे धारोष्ण दूध, गाईचे दही गोमुत्राच्या चौपट, गाईचे तूप गोमुत्राच्या चौपट घेऊन याचे मिश्रण मातीच्या भांड्यात अथवा मातीच्या मडक्यात करावे व रोज ग्रहण करावे. याने सर्व रोग दूर राहतातच शिवाय प्रकृती स्वास्थ्यही प्रदान करतात. पंच गव्य हे उत्कृष्ट नैसर्गिक देणगी आहे. ते विकास प्रवर्तक, रोग प्रतिबंधक, शक्तिवर्धक आहे. शेती साठी खत म्हणून आणि कीटक नाशक म्हणूनही उपयोगी आहे. याचा बऱ्याच धार्मिक विधीत उपयोग केला जातो.

गाईपासून उपलब्ध होणारे पदार्थ हे मनुष्य गर्भावस्थेपासून वृद्धत्वापर्यंत सर्वच अवस्थेत सर्व काळात अत्यंत उपयुक्त आणि ते शरीर व मन, बुद्धी या त्रयींना पुष्टी देणारे आहे.

१. गव्यं पवित्रं च रसायनं च पथ्यं च हृद्यं बलबुद्धिकृत् स्यात्। आयुःप्रदं रक्तविकारहारी त्रिदोषहृद्रोगविषापहं स्यात्॥
अर्थ : पंचगव्य (गायीचे गोमुत्र, शेणाचा रस, दूध, दही, तूप आदींपासून बनवलेले औषधी द्रव्य) परम पवित्र असे रसायन आहे. ते पथ्यकर आहे, हृदयाला आनंद देणारे, तसेच आयुष्य, बळ आणि बुद्धी देणारे आहे. ते त्रिदोषांचे शमन करणारे आहे, तसेच रक्तातील सर्व विकारांना दूर करणारे आहे. ते हृदयाचे आजार आणि विषाचा प्रभाव नष्ट करणारे आहे. हे ग्रहण केल्याने कायिक, वाचिक आणि मानसिक त्रास दूर होतात.

२. प्राशनं पञ्चगव्यस्य महापातकनाशनम् ।
अर्थ : पंचगव्याच्या प्राशनाने महापातकांचा नाश होतो.

सर्व प्रकारचे प्रायश्चित्त, धार्मिक कृत्ये आणि यज्ञ या वेळी पंचगव्य प्राशन करण्यास सांगितले आहे. वेद, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांमध्ये ते बनवण्याची पद्धत अन् ग्रहणविधी यांचे वर्णन आहे. ते शास्त्रोक्त पद्धतीने पावित्र्यपूर्वक मंत्रोच्चारासहित बनवले जाते.

पंचगव्य निर्माण
ताम्रयां मूत्र गृण्हियात् । शुक्लाया गोमयं तथा । पितयां पयो ग्राहृ । निलया दधि चोच्यते । कृष्णाया घृतं ग्राह्यं ।
महापातकनाशनम् ।

तांबड्या रंगाच्या गाईचे मूत्र, श्वेत रंगाच्या गाईचे शेण, पित वर्णाच्या गाईचे दूध, निळसर गाईचे दही, कृष्ण गाईचे तूप हे सर्व कोणत्याही ऋतूत पंचगव्य करून सेवनास ग्राह्य असून हे सर्व पापांचा रोगांचा नाश करणारे आहे. असे वचन यमस्मृती ७१ – ७२ मध्ये येते .

पंचगव्य निर्माण याला सुद्धा शास्त्रात महत्व व प्रमाण सांगितलेले आहे. त्याचे प्रमाण अनेकांना अहित नसते यास्तव इथे मांडत आहे.

गोमूत्र – ०८ मासे तांबडा
गोमय – १६ मासे पांढरा
दूध – १२ मासे पिवळा
दही – १० मासे निळा
तूप – ०८ मासे काळा

हे शास्त्रोक्त प्रमाण पंचगव्य मेलन करण्यासाठी सांगितलेले आहे . { १२ मासे = एक तोळा }

हे झाले प्रमाण तसेच याचे मिश्रण करताना प्रत्येक गव्य मिसळताना ठराविक श्लोक सुद्धा सांगितलेले आहेत ते आता पाहूया.

१ गोमूत्र
गोमूत्रंसर्व पापघ्नं पवित्रं रोग हानी कृत । सर्व तीर्थ मयं पुण्यं सर्व कर्मसु पावनम् ।।

२ गोमय
गोशकृद् गन्ध वद्यच्च शुद्धी कृत्सर्वं दोष ह्रत । पुष्टी कृततुष्टी कृन्निित्यम परमं मंगलं स्मृतम् ।।

३ दूध
कामधेनू समुद्भूतं वत्सोच्छिष्टं शुभं शुचि । सर्वदेव प्रियं दुग्धमं यस्माद् दध्याज्य सम्भव : ।।

४ दही
चंद्र मंडल संकाशं पयः फेननीभं शुचि । क्षीर तक्रस्य संयोगात् संभूतं यद्द्धीस्मृतम् ।।

५ तूप
आज्यं तेज : समुद्दिष्ठ माज्यं पाप हरन परम् । आज्यं सुराणा माहार आज्यें यज्ञ : प्रतिष्ठित: ।।

अश्या स्तोत्रांनी गव्य एकत्रित केल्या नंतर त्यात कुशोदक घालावे व ते पंचगव्य प्राशन करावे .

यत्व गस्ती गतं पापं देहे तिष्ठति मामके । प्राशनात पंचगव्यस्य दहत्वग्निरीवेंधनं ।।

या जपाने प्राशन करावे. या मुळे कोणतेच रोग आपल्या जवळ येऊ शकत नाहीत. याचे महत्व प्रत्येक धार्मिक विधी मध्ये सांगितलं आहे. कोणतेही देवकार्य याच्या प्राषणा शिवाय अथवा प्रोक्षणा शिवाय सुरूच होऊ शकत नाही .

किमान जे पंचगव्य वस्तू आदी निर्माण करत आहेत त्यांनी नक्की हे करावेच याचे मार्फत जो ऑरा निर्माण होतो तो खूपच फायदेशीर असतो.

या पैकी “गोमूत्राची” माहिती खालील प्रमाणे.
गोमूत्राचे वैद्यकीयदृष्ट्या महत्व : नवीन संशोधनानुसार गोमूत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.
०१.दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
०२. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित ५० मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
०३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
०४. गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
०५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
०६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
०७. सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
०८. महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
०९. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
१०. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
१२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
१३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
१४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
१५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
१६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरी होते.
१७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
१८. ५ पाने तुळशीची, ५ चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
१९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
२०. ३० मिली गोमुत्रात ३ चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
२१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
२२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
२३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
२४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
२५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
२६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
२७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
२८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात.
२९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
३५.२ ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे ५० ते १०० मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.
४०. गोमूत्र, शिरा व धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साठू देत नाही.
४१. किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
४२. प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या.
४३. किडणी व प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमुत्रामुळे सुधारते.
४४. गोमुत्र व तुळस सर्व वास्तुदोष घालवतात.
४५. गोमूत्र रक्तदाबातील अनियमितता दूर करते, रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी साहाय्य करते आणि रक्तशुद्धीसाठी परिणामकारक ठरते.
४६. गोमूत्र मुत्रपिंडाचे कार्य सुरळीत चालू ठेवते. मूतखडे सिद्ध होण्यास प्रतिबंधकारक ठरते.
४७. शरिराच्या एकसमान श्वसनास आणि शक्तीस साहाय्य करते.
४८. शरिरातील जंतूंच्या वाढीस प्रबंध करते. गँग्रीनसारख्या रोगाच्या जंतूंनाही ते परिणामकारक विरोध करते.
४९. हृदयाची कार्यक्षमता वाढवून निराशा घालवण्यास आणि समाधान मिळण्यास कारणीभूत ठरते.

गोमूत्रासारखे दूसरे कुठलेही औषध नाही, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त, कोणत्याही रोगांशिवायही नियमित घेऊ शकता. गोमूत्र नेहमी ८ पदरी सुती कापडाने गाळून घ्या. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने ते जास्त दिवस टिकून रहते. व्यायच्या आधी एक महिना आणि व्यायल्यानंतर १ महिना गोमुत्र घेऊ नये. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नये. ताजे गोमूत्र मिळत नसल्यास, गोधनअर्क घ्यावा व त्यासोबत गोमुत्र वटी जरूर घ्यावी.

वैदिक तूप
आजकाल अनेक वेळेस हा शब्द आपण उच्चरतो. अथवा आम्ही वैदिक पद्धतीनेच तूप करतो, वापरतो असे ऐकतो. परंतु ही वैदिक पद्धत म्हणजे काय ? हे समजून घेणे जरुरीचे आहे.

तूप विशिष्ट क्रमाने विशिष्ट वेळी वैदिक शास्त्रोक्त पद्धतीने केलेले तूप म्हणजे वैदिक तूप.

सर्व आयुर्वेदिक वनस्पतीमधील रसायनाचा राजा की जो मनाचा कारक आहे तो चंद्र ज्यावेळी उगवतो त्या वेळी सर्व ठिकाणी शीतलता प्राप्त होते आणि सर्व उपकारक औषधी गुणधर्म अन्नद्रव्यात गुण वृद्धी करतात. यासाठी ती चंद्राची शीतलता आवश्यक असल्याने शक्यतो हे चंद्रप्रकाशात केले जाते.

सूर्यास्त झाल्यावर प्रथम प्रहरी दूध दोहले जाते.

दोहणे म्हणजे फक्त उजव्या व डाव्या एक ,एक सडातीलच दूध घेणे. यानंतर ते शक्यतो त्याच गाईच्या गोवऱ्यांवर मृत्तिका (मातीच्या) भांड्यात मंद अग्नीवर ते तापवावे. दूध तापविल्यानंतर त्यात असणारे व तरंगणारे स्निग्ध पदार्थाचे कण वर येतात.
ते उष्णतेने वितळतात. या क्रियेदरम्यान, त्याचा एक पातळ थर दुधावर निर्माण होतो. ते कण एकमेकांना चिटकुन गार झाल्यावर तो जाडसर होतो. यालाच साय म्हणतात. साधारण दूध वर यायच्या काही क्षण आधी चुलीवरून उतरवावे.

दुसऱ्या प्रहरी त्या सर्व दुधात विरजण {दही } टाकून किमान ५ ते १० वेळा शक्यतो लाकडी डावाने फिरवा, दही टाकताना दूध थोडं कोमट असावे. दह्यात असणारे लॅक्टिक बॅक्टेरिया हे दुधात (सायीत) असणाऱ्या लॅक्टोज (एक प्रकारची साखर) याचे विघटन करतात व त्याद्वारे सायीतल्या स्निग्ध पदार्थात असलेले प्रथिनांचे कण एकत्र होऊन त्याचे एक घट्ट जाळे निर्माण होते. ते साईच्या दुधाचे दही मग घट्ट होते.

तिसऱ्या प्रहरात लागलेल्या दह्यात रवी घुसळून लोणी काढावे. या तयार झालेल्या घट्ट दह्यास थोडे पाणी टाकून घुसळण्याने त्यात अंतर्भूत असलेल्या अमिनो आम्लाच्या साखळ्या सुट्या होऊन स्निग्ध पदार्थांच्या कणांचा गोळा बनतो. तेच लोणी आहे.

अनेक भागात गार वातावरण मूळे दही लागण्यास वेळ होत असल्यास तिथे चिंचेच्या लाकडापासून तयार केलेली रवी वापरल्यास उत्तम अनुभव येतील. त्या व्यतिरिक्त नियमित ही रवी खैर अथवा शमी गर्भ यांचे लाकडातून बनवलेली असावी.

मृत्तिका अथवा पाषाण पात्रात हे लोणी मंद आचेवर कढविल्याने त्याचे ‘वैदिक तूप’ तयार होते. तुपात अँटिऑक्सिडंटस त्याचे कढविण्याने तयार होतात. त्याचा शरीरास फायदा होतो. हे तूप थंड झाल्यावर घट्ट होते. या नंतर शक्यतो काचेच्या बॉटल मध्ये हे हवाबंद ठेवल्यास कितीही वर्ष हे वास वगैरे न येत टिकून राहू शकते . रोहिणी नक्षत्रावर केलेले तूप हे विशेष फलदायी. कारण यातील ब्रम्हतत्व खूपच उच्च कोटीत असते. वैदिक तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड असते त्यामुळे हे पचण्यास एकदम हलके असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम या सारखे अनेक पोषक तत्व देखील उपल्ब्ध असतात. हे तुप खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. या तुपाने डोक्याचे मॉलिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत, तसेच त्वचेमध्ये चमक येण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल आणि वजन नियंत्रणात राहते. रोज रात्री एक चमचा तूप कोमट पाणी / दुधासोबत घेतल्यास पित्त विकार नष्ट होतात, बद्धकोष्ठता जाते. गरोदर महिलांसाठी अतिशय उपयुक्त.

अशा एक न अनेक कारणांवर हे वैदिक तूप आपण वापरू शकतो. म्हणूनच शक्यतो वैदिक पद्धतीनेच तूप करावे व अजून उत्तम अनुभव मिळवावेत.

  • जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले की मगच जेवायला सुरुवात करायची आपली परंपरा आहे. एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे.
  • जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.
  • घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.
  • तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.
  • तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.
  • तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.
  • डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालीश करावे.
  • शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.
  • तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.
  • रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळेमूळव्याध बरा होतो.
  • तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.
  • कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे.