
श्री सीताराम श्रीपती कोंढाळकर, अध्यक्ष

श्री कुबेर पोपटी, उपाध्यक्ष

श्री योगेश कोंढाळकर, खजिनदार

श्री संजय जोशी, सेक्रेटरी
आपल्या हिंदू धर्मात आणि हिंदू संस्कृतीमध्ये खूप पूर्वी पासून गायीला पवित्र स्थान दिले गेले आहे. पौराणिक काळात समुद्र मंथनातून कामधेनु उत्पन्न झाली अगदी तेव्हापासून गोमातेच इतिहास सुरु होतो. गावोपनिषद ग्रंथात महर्षी वसिष्ठ यांनी गोमातेची स्तुती केली आहे. अथर्व वेदात गोमातेला विश्वरूप म्हणून सन्मान केला गेला आहे. नंदी तर भगवान शिवांचे वाहन आहे.
आपल्या संस्कृतीचे महत्व लक्षात घेऊन श्री कुबेर पोपटी आणि श्री सीताराम कोंढाळकर यांनी वनाज कंपनीतून रिटायर्ड झाल्यावर गोसेवा करण्याचे ठरविले. श्री सीताराम कोंढाळकर यांची जमीन पुण्यापासून २७ किलोमीटर अंतरावर शेडगेवाडी येथे असल्याने तिथे दोन गायी घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचे काम २००९ मध्ये सुरु केले.
गोसेवेची सुरुवात म्हणून गायीची सर्व कामे स्वतःच करून गो आधारित शेती देखील सुरु करण्याचे ठरविले. २०१० पासून गो आधारित शेती चालू केली आणि त्याच दरम्यान सामाजिक ऋण फेडण्यासाठी पंचगव्याची औषधे तयार करण्याचे प्रशिक्षण दोघांनीही वयाच्या ६२ व्या वर्षी घेतले आणि विविध औषधे आणि उत्पादने तयार करण्यास स्वतःच्या गोशाळेत सुरुवात केली.
आज २०२६ साली आमच्या गोशाळेत ३६ गायींचा सांभाळ केला जातो आणि ५० प्रकारची उत्पादने तयार केली अजातात. यात जवळपास ४० प्रकारची दर्जेदार औषधे आणि इतर १० उत्पादने येथे केली जातात. तसेच गो आधारित शेती मधून इंद्रायणी तांदूळ, नाचणी, वाटणा, कडवे वाल अशी पिके घेतली जातात. गायींचे दुध जास्तीत जास्त प्रमाणात वासरांना पाजले जाते आणि अत्यंत थोड्या प्रमाणात दुध विक्री होते.
आमच्या गोशाळेत आम्ही सर्व प्रकारच्या उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण घेत असून आज पर्यंत दोन हजाराहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलेले आहे. कित्येकांनी प्रेरित होऊन स्वतःची गोशाळा सुरु केली तसेच अनेकांनी उत्पादन करण्यास सुरुवात केली आणि आज पर्यंत उत्पादने विक्री करीत आहेत.
आमच्या संस्थेची नोंदणी पब्लिक चॅरीटी ट्रस्ट आणि सोसायटी या दोन्ही कायद्या खाली केली आहे. Regs. No. Pune/0002239/2025
अध्यक्ष: श्री सीताराम श्रीपती कोंढाळकर, शिवतीर्थ नगर, कोथरूड, पुणे व्यवसाय- शेती. संपर्क ९१४५५३८७८४
उपाध्यक्ष: श्री कुबेर तुकाराम पोपटी, गुजरात कॉलनी, कोथरूड पुणे.
सचिव: श्री संजय गजानन जोशी, कर्वे नगर, पुणे, इंडियन ओवरसीज बँक मधून निवृत्त संपर्क ९२२६६८९१२९
खजिनदार: श्री योगेश सीताराम कोंढाळकर, जय भवानी नगर, कोथरूड, पुणे, संपर्क ९०२८३३५५०५